प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि स्नेहीं पालकांनो...🙏🏻

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन ह्या शैक्षणिक मित्र परिवाराचा शैक्षणिक वर्ष 2022-23 ह्या वर्षाचा दहावीच्या बॅचचा 'निरोप समारंभ ' दिनांक 26 मार्च 2023 रोजी अत्यंत उत्साहात संपन्न झाला...


स्नेहीं पालक, शिक्षकगण आणि विद्यार्थ्यांच्या सस्नेह सहकार्याबद्दल आमचा परिवार अगदी मनापासून हार्दिक आभार मानतो..

शैक्षणिक वर्षांत आपण सर्वांनी दिलेलं स्नेह आणि सहकार्य निश्चितचं..आमच्या अविरत आणि प्रामाणिक प्रयत्नांना योग्य न्याय देतं आपल्याही जिवापाड प्रयत्नांनां यशाचा सुगंध नक्कीच येईल ह्यात शंकाचं नाही मित्रांनो..

दरदिवशी नित्य नवं काही शिकण्याच्या उच्च उद्दात प्रेरणेनें आपलं भावी भविष्य सुंदर करणाच्या दृष्टीने पडलेलं प्रत्येक एक पाऊल आपल्या आयुष्याला एक नवी दिशा नक्कीच प्रदान करेल, हा विश्वास बाळगतो..

स्व:ओळख, स्वयं:शिस्तता, स्वयं:नियोजन, वक्तशिरपणा, सकारात्मक विचार,प्रतिकूल परिस्थितीला शरण नं जाता त्यावर आपल्या आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने मात करण्याचीं स्वं:तंत्र विकसित करणं, अखंड परिश्रम घेण्याचीं तयारी,श्वासत आणि सत्य असलेल्या जिवन मूल्यांचा पुरस्कार करीत,आयुष्यभर विद्यार्थी राहण्याच्या दीर्घ आणि दृढ विश्वासाने अपेक्षित आणि निश्चित ध्येंयां पर्यँत जाताना आपला स्वभाव विन्रम ठेऊनचं सर्वाचा आदर आणि मानसन्मान करीत आयुष्य खऱ्या अर्थाने समृद्ध आणि सफल करण्याच्या उद्दिष्टाने आपला पुढील प्रवास सुकर होवो..


येणारा काळ हा आपलाच आहे मित्रांनों..! 

त्याचं बिजारोपण योग्य वेळी करुन.. सतत कष्ट उपासण्याची जिद्द आणि आत्मविश्वास बाळगा..

आमचं सदैव प्रेरणादायी मार्गदर्शन,कडक शिस्त आणि सस्नेह संस्काराची शिदोरीसह अनेक आशीर्वाद नेहमीचं आपल्या सोबत आहेचं मित्रांनो..


आपल्या स्वप्नांना पंखाचं बळ देणाऱ्या,

उज्ज्वल भविष्याच्या स्वयं-सिद्धतेने ,

आकाशाला गवसणी घालणाऱ्या..

तमाम उत्तुंग कर्तृत्व असणाऱ्या

माझ्या सर्वं विद्यार्थी मित्रांना हिऱ्यांना,

पुढील भावी वाटचालीस...

मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा..


आपणा सर्वांचं हार्दिक जाहीर आभार..


कार्यक्रमाच्या सर्व फ़ोटोस पुढील लिंक वर मिळेल:

https://drive.google.com/drive/folders/1c7lem9oCIUjfSogmqXSbft5O0LXHLFeJ?usp=share_link


🎓 आपलाच विनम्र स्नेही आणि आभारी..🙏🏻

#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख..

 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.

https://www.vidhyarthimitra.com